Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उडत्या विमानात पायलटला आला हृदयविकाराचा झटका

उडत्या विमानात पायलटला आला हृदयविकाराचा झटका
, गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024 (15:59 IST)
लास वेगासमधून एक बातमी समोर आली आहे. जिथे पायलटचे कोणतेही पूर्व प्रशिक्षण किंवा परवाना नसताना एका यव्होन नावाच्या महिलेने आपले खाजगी विमान सुरक्षितपणे उतरवले. तसेच ही महिला आपल्या पायलट पतीसोबत एका खाजगी विमानात प्रवास करत असताना तिच्या पतीला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते विमान उडवू शकले नाही.
 
मिळालेल्या माहितीनुसार हे विमान सुमारे 5900 फूट उंचीवर उडत होते आणि दोघेही पती पत्नी लास वेगासहून कॅलिफोर्नियाकडे जात होते. 78 वर्षीय एलियट आल्पर यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा परिस्थिती गंभीर बनली. विमान हवेत डोलत होते आणि यव्होनला ना उड्डाणाचा अनुभव होता ना परवाना. पण घाबरण्याऐवजी त्यांनी धाडस दाखवत एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला. तसेच एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या सूचनांनुसार यव्होनने विमानाचा ताबा घेतला. व विमान सुरक्षित उतरविले. 

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची शिंदे मंत्रिमंडळाची केंद्र सरकारकडे मागणी