Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चीनमध्ये पुन्हा कोविड-19 चा धोका,शहरात लॉकडाऊन लागू

चीनमध्ये पुन्हा कोविड-19 चा धोका,शहरात लॉकडाऊन लागू
, शुक्रवार, 11 मार्च 2022 (20:00 IST)
चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वेग पुन्हा एकदा वाढला आहे. हे पाहता त्यांनी मोठ्या शहराला लॉक डाऊन लावले आहे आणि प्रथमच रॅपिड अँटीजन चाचणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
चीनने शुक्रवारी 9 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या ईशान्येकडील चांगचुन शहरात लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश दिले. या प्रदेशात कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यासाठी चीनने हा आदेश दिला आहे.
 
पुन्हा एकदा कोरोनाव्हायरस प्रकरणांमध्ये वाढ होत असताना चीनने शुक्रवारी सांगितले की ते प्रथमच रॅपिड अँटीजेन चाचण्या वापरण्यास सुरुवात करेल. गेल्या दोन वर्षात देशात कोरोना संसर्गाने उच्चांक गाठला आहे. येथील राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले आहे की क्लिनिकसाठी स्वयं-चाचणी किट उपलब्ध असतील आणि सामान्य नागरिक ते फार्मसी किंवा ऑनलाइनद्वारे खरेदी करू शकतात. 
 
शुक्रवारी देशभरात स्थानिक संक्रमणाची 397 प्रकरणे नोंदवली गेली, त्यापैकी 98 प्रकरणे जिलिन प्रांतात आली आहेत. शहरात केवळ दोन प्रकरणे नोंदवली गेली.  म्हणून अधिकाऱ्यांनी एक किंवा अधिक प्रकरणे असलेल्या भागात लॉकडाउन लादण्याचा निर्णय घेतला आहे.
 
दरम्यान, कोविड 19 चा प्रादुर्भाव वाढत असताना चीन प्रथमच रॅपिड अँटीजन चाचणी सुरू करणार असल्याचे आरोग्य आयोगाने म्हटले आहे. कोरोना प्रकरणांमध्ये या वाढीचे कारण ओमिक्रोन  प्रकार असल्याचे मानले जाते.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पेटीएम पेमेंट्स बँकेवर RBIचा बडगा, नवे ग्राहक जोडायला मनाई