जगातील सर्वात वयोवृद्ध महिला ल्युसिल रँडन यांचे वयाच्या 118 व्या वर्षी निधन झाले आहे. रँडनला सिस्टर आंद्रे या नावाने ओळखले जाते. माहितीनुसार, रँडनचा जन्म 11 फेब्रुवारी 1904 रोजी दक्षिण फ्रान्समध्ये झाला होता. सेंट-कॅथरीन-लेबरी नर्सिंग होमचे प्रवक्ते तावेला यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले जगातील सर्वात वृद्ध महिला असलेल्या फ्रेंच नन लुसिल रँडन यांचे निधन झाले आहे. तोलॉन येथील नर्सिंग होममध्ये झोपेतच त्याचा मृत्यू झाला.
टुलॉनचे महापौर हबर्ट फाल्को यांनी ट्विटरवर त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली. त्यांनी लिहिले, आज रात्री जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे निधन झाले. खूप दु:ख आणि वेदनादायक आहे
.
सेंट-कॅथरीन-लेबरी नर्सिंग होमचे प्रवक्ते तावेला म्हणाले की हे खूप दुःखदायक आहे. पण रॅन्डनची एकच इच्छा होती की आपल्या प्रिय भावाला भेटावे.
मिळालेल्या माहितीनुसार, जपानच्या केन तनाका यांचे वयाच्या 119 व्या वर्षी निधन झाले. यानंतर, रँडन या सर्वात वयोवृद्ध महिला होत्या. रँडनचा जन्म 11 फेब्रुवारी 1904 रोजी दक्षिण फ्रान्समध्ये झाला त्यांना सिस्टर आंद्रे या नावानेही ओळखले जात असे.
वयाच्या 40 व्या वर्षी 1944 मध्ये कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी रँडन यांनी प्रशासक आणि शिक्षक म्हणून काम केले. 1979 पासून त्या नर्सिंग होममध्ये आणि 2009 पासून टूलॉन होममध्ये होत्या.
नुकतेच रँडन म्हणाल्या होत्या की लोक म्हणतात काम हे माणसाला मारते, पण माझ्यासाठी कामाने मला जिवंत ठेवले. मी वयाच्या 108 व्या वर्षापर्यंत काम करत होते. 2021 मध्ये ल्युसिल रँडन कोविड पॉझिटिव्ह झाल्या आणि त्यातून बरे होऊन त्यांनी जगासमोर आदर्श ठेवला.
गेल्या वर्षी जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जपानचे केन तनाका यांचे निधन झाले. ते 119 वर्षांचे होते. तनाकाच्या मृत्यूनंतर, 118 वर्षीय सिस्टर लुसिली रँडन जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती होत्या.