Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमेरिकेने खरेदी केला कोरोनावरील औषधाचा संपूर्ण स्टॉक, इतर देशांची वाढेल समस्या

अमेरिकेने खरेदी केला कोरोनावरील औषधाचा संपूर्ण स्टॉक, इतर देशांची वाढेल समस्या
, गुरूवार, 2 जुलै 2020 (09:21 IST)
जगभरात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर काही ठराविक औषध अजून सापडलं नसलं तरी काही औषधं यावर प्रभावी ठरत आहेत. अशाच औषधांपैकी एक रेमडेसिवीर याचा संपूर्ण स्टॉक अमेरिकानं खरेदी केला आहे. ज्यामुळे इतर देशांना पुढील तीन महिने हे औषध उपलब्ध होऊ शकणार नाही.
 
अमेरिकेतल्या गिलियड सायन्स कंपनीचं औषध रेमडेसिवीर हे अँटिव्हायरल औषध असून कोरोना रुग्णांवर प्रभावी असल्याचे दिसून येत आहे. कोरोना रुग्णांवर या औषधाचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून यूएस फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने या औषधाचा कोरोना रुग्णांवर आपात्कालीन उपचारासाठी वापर करण्यास मंजुरी दिली. भारतातही कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आपत्कालीन वापरासाठी या औषधाला परवानगी देण्यात आली आहे.
 
म्हणून अमेरिकेनं या औषधाचा ग्लोबल स्टॉक खरेदी केला आहे. यूएस डिपार्टमेंड ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेजमार्फत 5 लाखांपेक्षा जास्त औषधांचे डोस खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रेल्वे खासगीकरणाच्या तयारीत, 109 मार्गांवर धावणार खासगी ट्रेन