Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय म्हणता, इथे मास्क घातला नाही म्हणून थेट पंतप्रधानांना दंड

काय म्हणता, इथे मास्क घातला नाही म्हणून थेट पंतप्रधानांना दंड
, बुधवार, 1 जुलै 2020 (08:10 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनलॉक २.० च्याबद्दल बोलताना कोरोना पासून रोखण्यासाठी नियमांचे पालन करण्याबाबत सांगितलं. त्यांनी यासंदर्भात बल्गेरियाच्या पंतप्रधानांचे उदाहरण देत सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यामुळे दंड भरावा लागला.

बल्गेरियाचे पंतप्रधानमंत्री चर्चमध्ये मास्क न घालता गेल्यामुळे त्यांच्याकडून १७४ डॉलर दंड आकारण्यात आले. भारतीय चलनानुसार जवळपास १३ हजार रुपयांचा दंड बल्गेरियाच्या पंतप्रधानांना भरावा लागला.  

या घटनेत, पंतप्रधान बोयको बोरिसोवर मे २०१७मध्ये बल्गेरियाचे पंतप्रधान झाले. त्यांना हा दंड यासाठी भरावा लागला कारण या देशाची आरोग्य मंत्रालयाने हा आदेश जारी केला होता की, इनडोर जागी मास्क घालणं अनिवार्य आहे.

 

बोरिसोव देशातील सर्वात मोठे ईस्टर्न ऑर्थोडॉक्स रिला चर्चमध्ये सरकार दौऱ्यावर गेले होते. बल्गेरियाची राजधानी सोफीया पासून ७० मैल दक्षिणमध्ये रिला माउंटेनवर हे चर्च आहे. या चर्चमध्ये फक्त पंतप्रधान नाहीतर त्याच्यासोबत गेलेल्या लोकांनी मास्क घातला नव्हता. त्यांच्याकडून देखील दंड आकारण्यात आला आहे. मंगळवारी झालेल्या या कार्याक्रमातला फोटो एका लोकल मीडियाने प्रसारित केला होता. यामध्ये पंतप्रधानांसोबत अनेक व्यक्ती मास्क विना दिसले होते.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता कल्याण-डोंबिवलीतही दहा दिवसांचा लॉकडाऊन