Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेल्वेने तुम्ही असा प्रवास असला तर तुम्हाला लाखो रुपये दंड होईल, बातमी पूर्ण वाचा

रेल्वेने तुम्ही असा प्रवास असला तर तुम्हाला लाखो रुपये दंड होईल, बातमी पूर्ण वाचा
, मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019 (09:38 IST)
नागपूर येथे रेल्वे प्रवासाचा मोठा घोटाळा उघड करण्यात रेल्वेला यश आले आहे. यामध्ये बनावट आधार कार्डाच्या सहाय्याने रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाने मोठी  कारवाई केली असून, तब्बल 105 प्रवाशांकडून 1 लाख 17 रुपयांचा दंड वसूल केला आहे. रेल्वेने प्रवास करण्यासाठी चक्क बनावट आधार कार्डाचा वापर करण्याचे एक मोठे रॅकेट यामुळे समोर आले आहे.
 
सणासुदीच्या दिवाळीच्या दिवसात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फार मोठी असते, मात्र  सर्वच प्रवाशांना तिकीट मिळेल आणि तिकीट मिळाल्यावर ते आरक्षित होईल याची शाश्वती फार कमी असते,  त्यामुळे रेल्वेच्या तिकीटाचा काळा बाजार करणाऱ्या दलालांनी हेच ओळखतात आणि त्यांनी यासठी  एक अनोखी आयडीया केली.  एखाद्या गाडीचे तिकीट हे दलाल सुमारे 3 ते 4 महिन्यांपूर्वीच बनावट नावाच्या आधारे बुक करत होते.
 
त्यानंतर गरजू प्रवाशांकडून प्रत्येक तिकीटामागे जादा पैसे उकळत होते व विकत होते. महत्त्वाचे म्हणजे  त्या प्रवाशांच्या खऱ्या नावाऐवजी त्यांची बनावट ओळख देखील तयार करण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना एक बनावट आधार कार्ड तयार करुन ते देत होते. ज्या नावाने या दलालांनी चार महिन्याआधी तीकीट बुक केले होते. त्या नावाने हे आधार कार्ड बनवले असे.
 
या सर्बाव प्रकारची गुप्त माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. त्यामुळे त्यांनी 3 नोव्हेंबरला नागपूरहून सुटणाऱ्या दुरांतो एक्सप्रेस सोबतच पुणे गरीबरथ एक्सप्रेस या दोन्ही ट्रेनमध्ये छापा टाकला होता, त्यावेळी रेल्वे सुरक्षा दलाने 105 प्रवाशांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध कारवाई केली आहे. हे प्रकरण अजूनही वाढण्याची शक्यात आहे. त्यामुळे तुम्ही जर असा प्रवास करत असला तर तुम्हाला लाखो रुपये दंड होऊ शकतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे समुद्रात जाण्यावर बंदी