अमेरिकेतील स्पिरिट एअरलाइन्सच्या जवळ वीज पडल्याने त्याचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. विमानाने फिलाडेल्फियाहून उड्डाण केले होते आणि ते कॅनकूनला जात होते. यादरम्यान, क्रूला विमानाजवळ वीज पडण्याच्या दोन घटना दिसल्या. यानंतर लगेचच विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
विमान कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, विमान कॅनकूनला जात होते. यादरम्यान, विजेचा झटका आल्याची माहिती मिळाल्यानंतर क्रूने विमानाला फिलाडेल्फिया आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले. सर्व प्रवासी सुरक्षित असून प्रवाशांच्या सोयीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे निवेदनात म्हटले आहे. मात्र, विमानात किती लोक होते, याची माहिती स्पिरिट एअरलाइन्सने दिलेली नाही. सध्या विमानतळाचे अधिकारी इमर्जन्सी लँडिंगची चौकशी करत आहेत.
एअर ट्रॅफिक कंट्रोल रेकॉर्डिंगने फ्लाइट क्रू आणि फिलाडेल्फिया एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स यांच्यातील परस्परसंवाद कॅप्चर केला. ज्यामध्ये असे म्हटले होते की उड्डाणाच्या मार्गावर दोनदा वीज पडली आणि आम्हाला हवाई क्षेत्रात परत यावे लागेल. विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता घडली .