Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Zoonotic Langya virus : चीनमध्ये आढळला झुनोटिक लांग्याचा नवीन विषाणू, 35 प्रकरणे आढळली

Zoonotic Langya virus : चीनमध्ये आढळला झुनोटिक लांग्याचा नवीन विषाणू, 35 प्रकरणे आढळली
, मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (18:41 IST)
Zoonotic Langya virus: चीनच्या शेंडोंग आणि हेनान प्रांतात लांग्या हेनिपाव्हायरसची लागण झालेले ३५ रुग्ण आढळले आहेत. इतकेच नाही तर अनेक प्राण्यांनाही या विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. हा विषाणू माणसापासून माणसांमध्ये पसरू शकतो की नाही याबाबत कोणतीही माहिती आलेली नाही. 
 
कोरोना संपला नव्हता तोच चीनमध्ये आणखी एक नवीन विषाणू आढळून आला आहे. तैवान सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार, चीनमध्ये झुनोटिक लांग्या विषाणू  विषाणू आढळला आहे. त्यामुळे जवळपास 35 जणांनाही लागण झाली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे .या विषाणूचा संसर्ग ओळखण्यासाठी आणि निरीक्षण करण्यासाठी न्यूक्लिक अॅसिड चाचणी पद्धत सुरू करेल.  
 
चीनच्या शेनडोंग आणि हेनान प्रांतात लांग्या हेनिपा विषाणूची लागण झालेले ३५ रुग्ण आढळून आल्याचे तपासात समोर आले आहे. चुआंग म्हणाले की चीनमधील 35  रुग्णांचा एकमेकांशी संपर्क नाही. तसेच या रुग्णांच्या कुटुंबीयांमध्ये आणि जवळच्या नातेवाईकांनाही संसर्ग झालेला नाही.  
 
35 पैकी 26 रुग्णांमध्ये ताप, थकवा, खोकला, भूक न लागणे, स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि उलट्या यांसारखी लक्षणे आढळून आली आहेत. रुग्णांमध्ये पांढऱ्या रक्तपेशींमध्येही घट दिसून आली. इतकेच नाही तर प्लेटलेट्स कमी होणे, यकृत निकामी होणे, किडनी निकामी होणे अशी लक्षणेही रुग्णांमध्ये आढळून आली आहेत.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंत्रिमंडळ विस्तार: शिंदे गट आणि भाजपमध्ये 15 महिला आमदार, मग मंत्रिमंडळात एकीलाही स्थान का नाही?