Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दुसरे महायुद्धातील किस झाला जगप्रसिद्ध नर्सचे ९२ वर्षी निधन

दुसरे महायुद्धातील किस झाला जगप्रसिद्ध नर्सचे ९२ वर्षी निधन
, मंगळवार, 13 सप्टेंबर 2016 (15:10 IST)
अमेरिकेपुढे जपानने शरणागती पत्करल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला होता . तर अमेरिकेत विजयाचा जल्लोष आणि आनंद  न्यूयॉर्कच्या टाइम्स चौकात साजरा करत होते. त्युआवेली  एका अमेरिकेतील सैनिका बरोबर  चुंबन घेताना टिपलेल्या छायाचित्रामुळे जगप्रसिद्ध झालेल्या नर्सचे अमेरिकेत वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. हे  cछायाचित्र  प्रसिद्ध आल्फ्रेड आयसेनस्टीट यांनी १४ ऑगस्ट १९४५ रोजी हा क्षण टिपला होता . तर  त्यातील जगप्रसिद्ध झालेल्या  नर्स ग्रेटा झिमर फ्रिडमन तेव्हा २१ वर्षांची होती. व्हर्जिनियातील रिचमंड येथील रुग्णालयात त्यांचे गुरुवारी निधन झाल्याची माहिती त्यांचे चिरंजीव जोशुआ फ्रिडमन यांनी दिली.
 
याट दुसरीकडे यावर आधारित असे पुस्तक  द किसिंग सेलर: द मिस्टरी बिहाइंड द फोटो दॅट एंडेड वर्ल्ड वॉर टू लेखक लॉरेन्स व्हेरिया यांनी म्हटले आहे की, ग्रेटा यांचे आई-वडील नाझी जर्मनीत झालेल्या वंशविच्छेदात मारले गेले. होते पंधरा वर्षांच्या ग्रेटा यांनी ऑस्ट्रियातून पळ काढून अमेरिकेत आश्रय घेतला. तेथे युद्धकाळात त्या दंतवैद्यक साहाय्यक म्हणून कार्यरत होते. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली असून,इतिहाच्या एका पर्वाचा अंत झाल्याचे म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टेक्सटाईल पार्कमुळे कृषी क्षेत्रात बदल घडू शकतो - मुख्यमंत्री