किंग्ज इलेव्हन पंजाबच्या पहिल्या ओव्हरमध्ये केएल राहुल आणि निकोलस पूरण फलंदाजीसाठी आले. त्याचवेळी कागिसो रबाडाने दिल्लीकडून गोलंदाजी केली. रबाडाच्या पहिल्या चेंडूवर राहुलने दोन धावा काढल्या. यानंतर दुसर्यार बॉलवर राहुल आणि तिसर्याी बॉलवर निकोलस बाद झाला. दिल्लीला विजयासाठी 6 चेंडूत 3 धावांची आवश्यकता होती.
त्यानंतर श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत दिल्लीसाठी फलंदाजीस उतरले. मोहम्मद शमीने गोलंदाजी केली. शमीच्या पहिल्या चेंडूला एकही रन नाही. दुसरा चेंडू वाइड होता, त्याला एक धाव मिळाली. यानंतर ऋषभ पंतने तिसर्याय चेंडूवर दोन धावा काढल्या. अशा प्रकारे सुपर षटकात दिल्लीच्या कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबला पराभूत करून सामना जिंकला.