Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

...म्हणून आयपीएलमध्ये नंबर वन आहे बुमराह

webdunia
गुरूवार, 17 सप्टेंबर 2020 (15:15 IST)
इंडियन प्रीमिअर लीगच्या 12 व्या सीझनमधील चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात 19 सप्टेंबर रोजी आयपीएलच्या 13 व्या सीझनचा पहिला सामना रंगणार आहे. अशातच मुंबई इंडियन्समधील स्टार गोलंदाज मलिंगाने या सीझनमधून माघार घेतली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. अशातच अस बोलले जात आहे की, मलिंगाने माघार घेतल्यामुळे संघाची जबाबदारी जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर आहे. परंतु, यादरम्यान ऑस्ट्रेलियाच्या जेम्स पॅटिनसनने भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह टी-20 विश्वातील सर्वश्रेष्ठ गोलंदाज असल्याचे सांगितले आहे.
 
मलिंगाने या सीझनमधून माघार घेतल्यानंतर संघात पॅटिनसनचा समावेश करण्यात आला आहे. पॅटिनसनचे म्हणणे आहे की, तो बुमराह आणि न्यूझीलंडच्या ट्रेंट बाउल्टसोबत खेळण्यासाठी उत्सुक आहे. मुंबई इंडियन्सच्या टि्वटर हॅन्डलवर पॅटिनसनचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. पॅटिनसन म्हणाला की, ‘स्वतःचे मत सांगायचे झाले तर जगभरातील सर्वश्रेष्ठ गोलंदाजांसोबत काम करणे अत्यंत उत्साहपूर्ण असणार आहे. अशातच बुमराह जगभरातील सर्वश्रेष्ठ गोलंदाजांपैकी एक आहे. आणि बाउल्टही संघात आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. मी यूएईमध्ये काही आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामुळे माझ्याकडे येथे खेळण्याचा अनुभव आहे.' दरम्यान, पॅटिनसनला आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-20 सामने खेळण्याचा अनुभव अत्यंत कमी आहे. या स्टार वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत फक्त चार आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये केवळ 3 विकेट्‌स आपल्या नावे केले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

महाराष्ट्रातला ठाकरे ब्रँड संपल्यास मुंबईचे पतन-संजय राऊत यांची निरर्धेक कोल्हेकुई