आयपीएल 2021 पुढे ढकलल्यानंतर सर्व क्रिकेट चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की या स्पर्धेचे उर्वरित सामने कधी आणि कोठे खेळले जातील. इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील उर्वरित सामने भारतात होणार आहेत की दुसर्या देशात खेळल्या जातील? या सर्व प्रश्नांची उत्तरे देताना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याची पुष्टी केली की आयपीएलचे उर्वरित सामने यापुढे भारतात खेळल्या जाणार नाहीत. मात्र गांगुली म्हणाले की सामना कधी व कोठे होणार हे सांगणे कठीण आहे.
'स्पोर्ट्स स्टार'शी संवाद साधताना सौरव गांगुलीला विचारले होते की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर आयपीएलचे उर्वरित सामने खेळता येतात का? यावर गांगुली म्हणाले, 'नाही, भारतीय संघाला 3 एकदिवसीय आणि 5 टी -20 सामन्यांसाठी श्रीलंकेत जावे लागेल. 14 दिवसांच्या क्वारंटाइन ठेवण्यासारख्या अनेक समस्या आहेत. हे भारतात होऊ शकत नाही. हे क्वारंटाइन भारतात खूपच अवघड आहे. आम्ही आयपीएल पूर्ण करण्यासाठी स्लॉट कसा शोधू सध्या हे सांगते येणार आही.' गांगुलीच्या म्हणण्यानुसार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर भारत जुलैमध्ये श्रीलंकेचा दौरा करेल.
विशेष म्हणजे अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यानंतर बीसीसीआयने आयपीएल 2021 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या चार काऊन्टी संघानेही इंग्लंड क्रिकेट बोर्डाला एक पत्र लिहून आयपीएलचे उर्वरित सामने आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचबरोबर मागील वर्षाप्रमाणे या वेळीही श्रीलंकेने आयपीएल सामन्यांचे आयोजन करण्याची ऑफर दिली आहे. इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन म्हणाले होते की, आयपीएलचे उर्वरित सामने भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका संपल्यानंतर सप्टेंबरमध्ये इंग्लंडमध्ये खेळले जावेत.