भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष (बीसीसीआय) आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर आहे. आज त्याला वुडलँड्स हॉस्पिटलमधून सोडण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात गांगुलीच्या ह्दयविकाराच्या त्रासानंतर अँजिओप्लास्टी झाली. रुग्णालयाच्या अधिकार्याने सांगितले की, बुधवारी गांगुली यांना रुग्णालयातून सोडण्यात येणार होते परंतु त्यांनी आणखी एक दिवस इथे थांबण्याची इच्छा व्यक्त केली.
डॉक्टर म्हणाले, गांगुली आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे
वुडलँड हॉस्पिटलच्या एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली बसू यांनी बुधवारी सांगितले की, "गांगुली वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त आहे." त्याने चांगली झोप ही घेतली आणि जेवण देखील केले. त्याला आणखी एक दिवस रुग्णालयात राहायचे आहे. तर आता तो उद्या घरी जाईल. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. "गांगुली यांना रुग्णालयातून सोडण्याची औपचारिकता पूर्ण झाली असून घरी आल्यावर त्याला घ्यावे लागणार्या औषधांची माहिती त्यांना व कुटुंबातील सदस्यांना देण्यात आली असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.