Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IPL 2022 MI vs RR : रोहित सेनेचा आज राजस्थानशी सामना, कधी, कुठे पाहता येईल जाणून घ्या

IPL 2022 MI vs RR : रोहित सेनेचा आज राजस्थानशी सामना, कधी, कुठे पाहता येईल जाणून घ्या
, शनिवार, 2 एप्रिल 2022 (16:12 IST)
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 15व्या हंगामातील नववा सामना शनिवारी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघ या मोसमातील आपला दुसरा सामना खेळणार आहेत.या हंगामात राजस्थानचा संघ खूप मजबूत दिसत आहे तर सूर्यकुमारच्या आगमनाने मुंबईचा संघ अधिक ताकदवान होईल. अशा स्थितीत दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे.
 
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना शनिवारी म्हणजेच 2 एप्रिल रोजी होणार आहे.मुंबई आणि राजस्थान यांच्यातील हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे.
 
मुंबई आणि राजस्थान सामन्यात नाणेफेक भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता, तर पहिला चेंडू 3.30 वाजता टाकला गेले. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 
 
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहितने कोणताही बदल न करता या सामन्यात प्रवेश केला आहे. या सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवचे मुंबईच्या संघात पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र तसे झाले नाही. त्याचबरोबर राजस्थानच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. नॅथन कुल्टर-नाईलच्या जागी नवदीप सैनीचा संघात समावेश करण्यात आला आहे. नवदीप सैनीचा राजस्थानसाठी हा पहिलाच सामना आहे. 
 
मुंबई आणि राजस्थान सामन्यांचे प्रसारण हक्क स्टार नेटवर्ककडे आहेत. त्यामुळे स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरही या सामन्याचे प्रसारण होणार आहे. स्टार स्पोर्ट्स चॅनलवर तुम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये थेट सामने पाहू शकता.
भारतातील हॉटस्टार अॅपवर सर्व आयपीएल सामन्यांचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.
 
मुंबई संघ
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), अनमोलप्रीत सिंग, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी.
 
राजस्थान संघ
जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर आणि कर्णधार), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनसेचा गुढी पाडवा मेळावा शिवाजी पार्क येथे आज