इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 16व्या हंगामाला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यात चार वेळचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्जचा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सशी होणार आहे. आता स्पर्धा सुरू होण्यास एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशा स्थितीत बहुतांश संघांनी सराव सुरू केला आहे. चेन्नई सुपर किंग्जचे बहुतांश खेळाडूही चेन्नईला पोहोचले आहेत.
ते पोहोचल्यावर विमानतळापासून ते टीम हॉटेलपर्यंत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. कोरोना महामारीमुळे चेन्नई सुपर किंग्ज संघ तीन वर्षांपासून त्यांच्या घरच्या मैदानावर एकही आयपीएल सामना खेळू शकला नाही. धोनीसह संपूर्ण संघाला स्टेडियममध्ये पाहण्यासाठी चाहते तीन वर्षांपासून वाट पाहत आहेत. धोनीवर फुलांचा वर्षाव झाला.
धोनीने ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीने 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्जला चॅम्पियन बनवले आहे. मात्र, गेल्या वर्षी मेगा लिलावानंतर संघाची कामगिरी निराशाजनक होती. गुणतालिकेत ती नवव्या क्रमांकावर होती. धोनीने टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी कर्णधारपदही सोडले होते. त्याच्या जागी रवींद्र जडेजाला कर्णधारपद देण्यात आले. पण तो पद सांभाळू शकला नाही .अशा स्थितीत धोनीला पुन्हा कमान देण्यात आली.
चेन्नई सुपर किंग्ज संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, शुभांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, दीपक चहर, तुषार देसाई, चोपडे मुंडे , मथिशा पाथीराना, सिमरजीत सिंग, प्रशांत सोलंकी, महिश तिक्ष्णा, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, शेख रशीद, निशांत सिंधू, अजय मंडल, भगत वर्मा.