Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महिला आयपीएल 2023 : पूर्ण माहिती कोणाला किती मिळाले पैसे सर्वांत महागडी खेळाडू एक रिपोर्ट

smruti mandhana
, बुधवार, 15 फेब्रुवारी 2023 (15:41 IST)
महिलांच्या आयपीएलला ४ मार्चला सुरुवात होणार आहे. हा सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. आयपीएलमध्ये पाच संघांमध्ये २२ सामने खेळवण्यात येणार आहे. पण या आयपीएलमध्ये दोन दिवस ब्रेक असणार आहे. १७ आणि १९ मार्च या दिवशी महिला आयपीएलचे सामने होणार नाहीत. त्याचबरोबर २२ मार्चला आयपीएलची साखळी फेरी संपणार आहे. त्यानंतर २४ मार्चला आयपीएलमध्ये एलिमिनेटरचा सामना सुरु होणार आहे. त्यानंतर २६ मार्चला महिलांच्या आयपीएलचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर होणार आहे. आयपीएलचे सामना यावेळी जास्तकरून मुंबई आणि नवी मुंबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. मुंबईमध्ये ब्रबॉर्न स्टेडियमवर हे सामने होतील, पण वानखेडे स्टेडियममध्ये मात्र हे सामने होणार नसल्यचाे म्हटले जात आहे. कारण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना वानखेडेवर होणार आहे. त्यानंतर वानखेडेची खेळपट्टी पुरुषांच्या आयपीएलसाठी तयार करण्यात येणार आहे.
 
स्मृती मानधना लिलावातील सर्वांत महागडी खेळाडू
महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या पहिल्या हंगामापूर्वीचा खेळाडू लिलाव सोमवारी (१३ फेब्रुवारी) पार पडला. या लिलावात अपेक्षेप्रमाणे भारताच्या खेळाडू प्रमुख आकर्षण ठरल्या. भारताच्या १० महिला खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली. भारताची डावखुरी सलामीवीर स्मृती मानधना लिलावातील सर्वांत महागडी खेळाडू ठरली. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने सर्वाधिक ३.४० कोटी रुपयांच्या बोलीसह मानधनाला आपल्या संघात समाविष्ट करून घेतले. 
 
भारताच्या अन्य कोणत्या खेळाडू कोट्यधीश ठरल्या?
‘डब्ल्यूपीएल’च्या लिलावात पाचही संघांनी सर्वोत्तम भारतीय खेळाडूंना खरेदी करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. त्यामुळेच भारताच्या १० खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली. यामध्ये मानधनासह अष्टपैलू दीप्ती शर्मा (२.६० कोटी, यूपी वॉरियर्स), फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज (२.२० कोटी, दिल्ली कॅपिटल्स), सलामीवीर शफाली वर्मा (२ कोटी, दिल्ली कॅपिटल्स), यष्टिरक्षक-फलंदाज रिचा घोष (१.९० कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु), अष्टपैलू पूजा वस्त्रकार (१.९० कोटी, मुंबई इंडियन्स), फलंदाज हरमनप्रीत कौर (१.८० कोटी, मुंबई इंडियन्स), वेगवान गोलंदाज रेणुका सिंह ठाकूर (१.५० कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु), यष्टिरक्षक-फलंदाज यास्तिका भाटिया (१.५० कोटी, मुंबई इंडियन्स), अष्टपैलू देविका वैद्य (१.४० कोटी, यूपी वॉरियर्स) या खेळाडूंचा समावेश होता.
webdunia
लिलावात हे खेळाडू विकले गेले
स्मृती मंधाना (मूळ किंमत ५० लाख रुपये) RCB ३.४ कोटी
हरमनप्रीत कौर (मूळ किंमत ५० लाख रुपये) मुंबई इंडियन्स १.८ कोटी
सोफी डिव्हाईन (मूळ किंमत ५० लाख रुपये) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ५० लाख
अॅश्ले गार्नर (मूळ किंमत ५० लाख रुपये) गुजरात जायंट्स ३.२ कोटी
एलिस पेरी (मूळ किंमत ५० लाख रुपये) RCB INR १.७ कोटी
सोफी एक्लेस्टोन (मूळ किंमत ५० लाख रुपये) UP Warriorz ला १.८ कोट
दीप्ती शर्मा (मूळ किंमत ५० लाख रुपये) UP Warriorz ला २.६ कोटी
रेणुका सिंग (मूळ किंमत ५० लाख रुपये) RCB १.५ कोटी
Natalie Sciver-Brunt (मूळ किंमत ५० लाख रुपये) मुंबई इंडियन्सला ३.२ कोटी
ताहलिया मॅकग्रा (मूळ किंमत ५० लाख रुपये) UP Warriorz ला १.४ कोटी
बेथ मुनी (मूळ किंमत ४० लाख रुपये) गुजरात जायंट्सला २ कोटी
शबनिम इस्माईल (मूळ किंमत ४० लाख रुपये) UP Warriorz ला १ कोटी
अमेलिया केर (मूळ किंमत ४० लाख रुपये) मुंबई इंडियन्सला १ कोटी
सोफिया डंकले (मूळ किंमत ३० लाख रुपये) गुजरात जायंट्सला ६० लाख
जेमिमाह रॉड्रिग्स (मूळ किंमत ५० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला २.२ कोटी
मेग लॅनिंग (मूळ किंमत ५० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला १.१ कोटी
शफाली वर्मा (मूळ किंमत ५० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला २ कोटींना
अॅनाबेल सदरलँड (मूळ किंमत ३० लाख रुपये) गुजरात जायंट्सला ७० लाख
हरलीन देओल (मूळ किंमत ४० लाख रुपये) गुजरात जायंट्सला ४० लाख
पूजा वस्त्रकर (मूळ किंमत ५० लाख रुपये) मुंबई इंडियन्सला १.९ कोटी
डिआंड्रा डॉटिन (मूळ किंमत ५० लाख रुपये) गुजरात जायंट्सला ६० लाख
यास्तिका भाटिया (मूळ किंमत ४० लाख रुपये) मुंबई इंडियन्सला १.५कोटी
ऋचा घोष (मूळ किंमत ५० लाख रुपये) RCB १.९ कोटी
Alyssa Healy (मूळ किंमत ५० लाख रुपये) UP Warriorz ला ७० लाख
अंजली सरवानी (मूळ किंमत ३० लाख रुपये) UP Warriorz ला ५५ लाख
राजेश्वरी गायकवाड (मूळ किंमत ४० लाख रुपये) UP Warriorz ला ४० लाख
राधा यादव (मूळ किंमत ४० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला ४० लाख
शिखा पांडे (मूळ किंमत ४० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला ६० लाख
स्नेह राणा (मूळ किंमत ५० लाख रुपये) गुजरात जायंट्सला ७५ लाख
मॅरिझान कॅप (मूळ किंमत ४० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला १.५ कोटी
पार्शवी चोप्रा (मूळ किंमत १० लाख रुपये) UP Warriorz ला १०  लाख
तितास साधू (मूळ किंमत १० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला २५ लाख
श्वेता सेहरावत (मूळ किंमत १० लाख रुपये) UP Warriorz ला ४० लाख
एस यशश्री (मूळ किंमत १० लाख रुपये) UP Warriorz ला १० लाख
किरण नवगिरे (मूळ किंमत १० लाख रुपये) UP Warriorz ला ३० लाख
एस मेघना (मूळ किंमत ३० लाख रुपये) गुजरात जायंट्सला ३० लाख
रिन बर्न्स (मूळ किंमत ३० लाख रुपये) RCB ३० लाख
हीदर ग्रॅहम (मूळ किंमत ३० लाख रुपये) मुंबई इंडियन्स ३० लाख
ग्रेस हॅरिस (मूळ किंमत ३० लाख रुपये) UP Warriorz ला ७५ लाख
जॉर्जिया वेअरहॅम (मूळ किंमत ३० लाख रुपये) गुजरात जायंट्सला ७५  लाख
अॅलिस कॅप्सी (मूळ किंमत ३० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला ७५ लाख
Issy Wong (मूळ किंमत ३० लाख रुपये) मुंबई इंडियन्स ३० लाख
मानसी जोशी (मूळ किंमत ३० लाख रुपये) गुजरात जायंट्स ३० लाख
देविका वैद्य (मूळ किंमत ४० लाख रुपये) UP Warriorz ला 1.4 कोटी
अमनजोत कौर (मूळ किंमत ३० लाख रुपये) मुंबई इंडियन्स ५० लाख
डी हेमलता (मूळ किंमत ३० लाख रुपये) गुजरात जायंट्सला ३० लाख
लॉरेन बेल (मूळ किंमत ३० लाख रुपये) UP Warriorz ला ३० लाख
मोनिका पटेल (मूळ किंमत ३० लाख रुपये) UP Warriorz ला ३० लाख
तारा मॉरिस (मूळ किंमत १० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्स १० लाख
लॉरा हॉरिस (मूळ किंमत १० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्स ४५ लाख
धारा गुजर (मूळ किंमत १० लाख रुपये) मुंबई इंडियन्स १० लाख
जसिया अख्तर (मूळ किंमत २० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्स २० लाख
दिशा कासट (मूळ किंमत १० लाख रुपये) RCB ला १० लाख
लक्ष्मी यादव (मूळ किंमत १० लाख रुपये) UP Warriorz ला १० लाख
इंद्राणी रॉय (मूळ किंमत १० लाख रुपये) RCB ला १० लाख
मिन्नू मणी (मूळ किंमत १० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्स ३० लाख
श्रेयंका पाटील (मूळ किंमत १० लाख रुपये) RCB ला १० लाख
कनिका आहुजा (मूळ किंमत १० लाख रुपये) RCB ला ३५ लाख
तनुजा कंवर (मूळ किंमत १० लाख रुपये) गुजरात जायंट्स ५० लाख
सायका इशाक (मूळ किंमत १० लाख रुपये) मुंबई इंडियन्स १० लाखांना
आशा शोबना (मूळ किंमत १० लाख रुपये) RCB ला १० लाख
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आणखी एक देश भूकंपाने हादरला