Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders : दोन वेळचा चॅम्पियन संघ कोलकाता नाइट रायडर्सने गुरुवारी रोमांचक विजय नोंदवला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या IPL-2023 सामन्यात KKR ने सनरायझर्स हैदराबादचा 5 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे हैदराबादला चालू हंगामातील प्ले ऑफमध्ये पोहोचणे कठीण झाले आहे. मोसमातील या 47व्या सामन्यात केकेआरचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाने निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावत 171 धावा केल्या, त्यानंतर हैदराबाद संघाला 8 विकेट गमावत 166 धावा करता आल्या.
172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात काही खास राहिली नाही आणि 37 धावांत त्यांचे 2 विकेट पडल्या. डावाच्या तिसऱ्या षटकात हर्षित राणाने मयंक अग्रवालला (18) गुरबाजकडे झेलबाद केले. त्यानंतर चौथ्या षटकात अभिषेक शर्माला (9) शार्दुल ठाकूरने धावबाद केले. राहुल त्रिपाठीने (9 चेंडूत 20 धावा) आंद्रे रसेलविरुद्ध हात उघडण्याचा प्रयत्न केला आणि 2 चौकार, एक षटकार मारला पण डावाच्या सहाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर तो वैभव अरोराकडे झेलबाद झाला. हॅरी ब्रुकला अनुकुल रॉयने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला, त्यामुळे संघाची धावसंख्या 6.2 षटकांत 4 बाद 54 अशी झाली.