Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 8 January 2025
webdunia

IPL 2024 मध्ये एक नवा विक्रम रचला,पहिल्यांदाच इतके षटकार लागले

IPL 2024 मध्ये एक नवा विक्रम रचला,पहिल्यांदाच इतके षटकार लागले
, बुधवार, 15 मे 2024 (19:37 IST)
आयपीएलचा सध्याचा हंगामात अनेक विक्रम झाले आहे. एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही याच वर्षी झाला.आता षटकार मारण्याचा मोठा विक्रमही केला गेला आहे. आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत इतके षटकार लगावण्यात आले आहे , जे आतापर्यंत कोणत्याही सीझनमध्ये दिसले नव्हते

आयपीएल 2024 मध्ये षटकारांचा नवा विक्रम झाला. 
मोसमातील 64 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचे संघ आमनेसामने होते. या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून 20 षटकार ठोकले. यासह, आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत एकूण 1125 षटकार मारले गेले आहेत, जो एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा नवीन विक्रम आहे.
आयपीएलच्या 17 हंगामात 1000 हून अधिक षटकार मारण्याची ही केवळ तिसरी वेळ आहे. 
 
IPL 2024 मध्ये अभिषेक शर्माने आतापर्यंत सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. त्याने 12 सामन्यात 35 षटकार मारले आहेत. या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे.विराट कोहलीने यावेळी 33 षटकार ठोकले आहेत.या यादीत सुनील नारायण 32 षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
 
Edited by - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

CAA: CAA अंतर्गत 14 लोकांना दिले नागरिकत्व प्रमाणपत्र,गृह मंत्रालयाची माहिती