Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

GT vs SRH : गुजरात विरुद्ध सनरायझर्स सामना आज, प्लेइंग 11 जाणून घ्या

SRH vs GT
, रविवार, 31 मार्च 2024 (13:48 IST)
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज गुजरात टायटन्सचा सामना फॉर्मात असलेल्या सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. सनरायझर्सने त्यांच्या शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध दमदार कामगिरी करत आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या केली होती. सनरायझर्स गुजरातसाठी धोका ठरू शकतो, पण या सामन्यात पुन्हा एकदा नजर गुजरातचा कर्णधार शुभमन गिलवर असेल, जो संघाच्या घरच्या मैदानावर जोरदार फलंदाजी करतो. गुजरातने मुंबईविरुद्ध विजयाने सुरुवात केली होती, परंतु मागील सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जकडून (CSK) पराभव पत्करावा लागला होता.
 
गेल्या सामन्यात सनरायझर्सने चमकदार कामगिरी केली असली तरी अहमदाबादमध्ये शुभमन गिलचा विक्रम चांगला आहे. गिलने अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या 13 आयपीएल डावांमध्ये 63.6 च्या सरासरीने 700 धावा केल्या आहेत. कोणत्याही एका मैदानावर किमान 500 धावा करणाऱ्या फलंदाजाची ही चौथी सर्वोत्तम कामगिरी आहे. गिलने पाच डावांत 50 हून अधिक धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत गिलला या मैदानावर रोखणे कोणत्याही संघाच्या गोलंदाजांसाठी सोपे नाही. सनरायझर्सला चांगली कामगिरी करायची असेल तर गिलला रोखण्याचा मार्ग शोधावा लागेल. ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अभिषेकवर सर्वांच्या नजरा असतील.ट्रॅव्हिस हेडने संस्मरणीय पदार्पण केले असून, गेल्या सामन्यात त्याने सनरायझर्ससाठी 18 चेंडूत सर्वात जलद अर्धशतक झळकावले.
 
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11
 
गुजरात टायटन्स: ऋद्धिमान शाह (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवातिया, रशीद खान , साई किशोर, उमेश यादव, मोहित शर्मा, स्पेन्सर जॉन्सन
 
सनरायझर्स हैदराबाद: मयंक अग्रवाल, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (क), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.
 
Edited By- Priya Dixit   
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Rule Change : 1 एप्रिलपासून अनेक महत्त्वाचे नियम बदलणार, जाणून घ्या