प्रत्येक नवीन आर्थिक वर्षात अनेक नवीन नियम लागू होतात, ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. असे अनेक नियम 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. यामध्ये EPFO, Fastag आणि SBI क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांचा समावेश आहे.
EPFO
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू करू शकते. या नवीन नियमानुसार ईपीएफ खातेदाराने नोकरी बदलताच. त्यासोबत त्याचा जुना पीएफ शिल्लक नवीन खात्यात ट्रान्सफर होईल. याचा फायदा असा होईल की नोकऱ्या बदलल्यानंतर तुम्हाला तुमचा जुना पीएफ बॅलन्स नवीन खात्यात ट्रान्सफर करण्याची गरज नाही. हे स्वयंचलित होईल.
NPS
1 एप्रिलपासून नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) च्या लॉग-इन प्रक्रियेत मोठा बदल होणार आहे. पीएफआरडीएकडून पुढील महिन्यापासून टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन लागू केले जात आहे. यानंतर, कोणताही एनपीएस धारक केवळ आधार आधारित ओटीपीद्वारे एनपीएसमध्ये लॉग इन करू शकेल.
नवीन कर व्यवस्था
नवीन कर प्रणाली 1 एप्रिल 2024 पासून डीफॉल्ट कर प्रणाली म्हणून लागू केली जाणार आहे. याचा अर्थ असा की, जर तुम्ही कर भरताना जुनी कर व्यवस्था निवडली नाही, तर 1 एप्रिलपासून नवीन कर प्रणाली आपोआप निवडली जाईल.
SBI क्रेडिट कार्ड
SBI कार्डने क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. नवीन नियमानुसार, आता सर्व SBI क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरल्यास रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत. हा बदल 1 एप्रिल 2024 पासून काही क्रेडिट कार्डमध्ये तर काही क्रेडिट कार्डमध्ये 15 एप्रिल 2024 पासून लागू होणार आहे.
फास्टॅग
1 एप्रिलपासून फास्टॅगचे नियमही बदलणार आहेत. जर तुम्ही तुमच्या फास्टॅगची केवायसी प्रक्रिया 31 मार्च 2024 पर्यंत पूर्ण केली नसेल तर 1 एप्रिलपासून तुमचा फास्टॅग काम करणे बंद करेल.