फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव केला.
कोलकाता संघ प्लेऑफ मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. केकेआरने मुंबईला विजयासाठी 16 षटकांत 158 धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र मुंबई संघाला निर्धारित 16 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 139 धावाच करता आल्या.
पावसामुळे सामना दोन तास 15 मिनिटे उशिराने सुरू झाला. पावसाने सामन्यात व्यत्यय आणल्याने सामना 16-16 असा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
केकेआरला सुरुवातीच्या धक्क्यातून सावरता आले नाही आणि संघाने 16 षटकांत सात गडी गमावून 157 धावा केल्या. केकेआरसाठी व्यंकटेश अय्यरने २१ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४२ धावा केल्या. मुंबईसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने प्रत्येकी दोन बळी घेतले.
KKR चा 12 सामन्यांमधला हा नववा विजय असून 18 गुणांसह ते अव्वल स्थानावर आहे. कोलकातानंतर राजस्थानचा संघ आहे ज्याचे 11 सामन्यांत 16 गुण आहेत. रविवारी राजस्थानचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी (CSK) होणार आहे. जर राजस्थान हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला तर प्लेऑफमध्ये पोहोचणारा KKR नंतरचा दुसरा संघ ठरेल.तर मुंबईचा 13 सामन्यांमधला हा नववा पराभव असून गुणतालिकेत ते नवव्या स्थानावर आहेत. मुंबई संघ प्लेऑफ मधून बाहेर आहे.