इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चा 59 वा सामना गुजरात टायटन्स (GT) आणि पाच वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सुरक्षेमध्ये मोठी चूक झाली.
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे जगभरात लाखो चाहते आहेत. धोनी जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात येतो तेव्हा त्याचे नाव सर्वत्र ऐकू येते. धोनीची झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुरलेले असतात. धोनी फलंदाजी साठी आल्यावर त्याच्या एका चाहत्याने शेवटच्या षटकात सुरक्षा तोडून थेट मैदानात प्रवेश केला आणि त्याला मोठी मारून त्याच्या पाया पडला.हे पाहून त्याने सर्वांचे मन जिंकले.
त्याच्या मागे लगेचच सुरक्षा रक्षक धावत आले आणि त्याला धरून बाहेर काढले. दरम्यान सामना काही काळ थांबला. या वेळी धोनीला देखील चाहत्याला जवळ पाहून आश्चर्य झाला.नंतर त्याने चाहत्याला उचलून गळाभेट घेतली. धोनीने जे काही केले ते पाहून चाहत्यांना आनन्द झाला आहे.
या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धोनीने 11 चेंडूंचा सामना करत 26 धावा केल्या. या नाबाद खेळीदरम्यान माहीच्या बॅटमधून एक चौकार आणि तीन षटकार आले. त्याने आयपीएलमध्ये 250 षटकारही पूर्ण केले. मात्र संघाला पराभवाचा सामना करावा लागला.