IPL च्या 17 व्या मोसमातील 59 वा लीग सामना गुजरात आणि चेन्नई यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी सीएसकेसाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे.
चेन्नई सुपर किंग्जसध्या 12 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत.प्लेऑफमध्ये सहज स्थान मिळवण्यासाठी त्याला उर्वरित तीन सामने जिंकावे लागणार. गुजरात आणि चेन्नई यांच्यात यंदाच्या मोसमात दुसऱ्यांदा हा सामना खेळला जाणार आहे, ज्यामध्ये सीएसकेने गेल्या सामन्यात 63 धावांनी मोठा विजय मिळवला होता.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खूप धावा केल्या जातात. हे मैदान मोठे आहे, पण फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही ते उपयुक्त आहे.
चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने आयपीएलच्या 17 व्या मोसमात आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांना 6 सामने जिंकता आले आहेत, तर 5मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. CSK सध्या 12 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे,
चेन्नई सुपर किंग्ज संघ
अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, रिचर्ड ग्लीसन, तुषार देशपांडे, समीर रिझवी, सिमरजीत सिंह, शेखर मुशी, शेखर शेख , प्रशांत सोळंकी, रचिन रवींद्र, अजय जाधव मंडल, आर.एस. भुंगेकर, महेश तिक्षीना, निशांत सिंधू, अरावेली अवनीश.
गुजरात संघ
वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, शाहरुख खान, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, मोहित शर्मा, जोशुआ लिटल, संदीप वॉरियर, विजय शंकर, मानव सुथार, जयंत यादव, दर्शन नळकांडे. , शरथ बीआर, केन विल्यमसन, मॅथ्यू वेड, उमेश यादव, अभिनव मनोहर, आर साई किशोर, कार्तिक त्यागी, स्पेन्सर जॉन्सन, अजमतुल्ला ओमरझाई, सुशांत मिश्रा.