राजस्थान संघ 7 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळला. या सामन्यात संजू सॅमसन पंचांशी वाद घालताना दिसला. बीसीसीआयने राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनवर मोठी कारवाई केली आहे.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसन 46 चेंडूत 86 धावा करून बाद झाला. या खेळीत संजू सॅमसनने 8 चौकार आणि 6 षटकार मारले. पण 16व्या षटकात तो झेलबाद झाला. त्याने मुकेश कुमारच्या चेंडूवर मोठा फटका मारला, तो बाऊंड्री लाईनवर उभ्या असलेल्या शाई होपने झेलबाद केला. तिसऱ्या पंचाने त्याला बाद घोषित केले. पण बाद झाल्यानंतर तो पंचांशी वाद घालताना दिसला.
बीसीसीआयने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून संजू सॅमसनला दंड ठोठावला आहे.
BCCI ने म्हटले आहे की राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आयपीएल 2024 च्या 56 व्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 30 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
सॅमसनने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.8 अंतर्गत लेव्हल 1 चा गुन्हा केला आहे.या अंतर्गत त्याच्यावर दंड ठोठावला आहे. याआधी विराट कोहलीला पंचांशी वाद घातल्याबद्दल दंडही ठोठावण्यात आला आहे.