Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IPL 2024:T20 विश्वचषकापूर्वी बुमराहला विश्रांती मिळणार! फलंदाजी प्रशिक्षक म्हणाले

bumrah
, बुधवार, 8 मे 2024 (00:40 IST)
आयपीएल 2024 सीझननंतर अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन केले जाणार आहे. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या जागतिक स्पर्धेसाठी भारताच्या 15 सदस्यीय संघाचा भाग आहे. मुंबईचा प्रवास या हंगामात चांगला नाही आणि संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. 
 
बुमराहला विश्वचषकापूर्वी विश्रांती द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे कारण तो टी-२० विश्वचषक भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे.या वर मुंबई इंडियन्सचे फलंदाजी प्रशिक्षक किरॉन पोलार्ड म्हणाले की जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याचा संघाचा असा काहीही  विचार नाही . 

टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर बुमराहला विश्रांती देण्याच्या प्रश्नावर पोलार्ड म्हणाला, आम्ही याबद्दल बोललो नाही. हे माझे काम आहे असे मला वाटत नाही पण बघूया काय होते ते. आम्ही सर्वजण संपूर्ण आयपीएल खेळण्यासाठी येथे आहोत. आयपीएल पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्यानंतर काय होते ते पाहू.
 
मुंबई इंडियन्स आता 17 मे रोजी घरच्या मैदानावर लखनौ सुपरजायंट्सशी भिडणार आहे. या आयपीएलमधील ग्रुप स्टेजमध्ये मुंबई संघाचा प्रवास संपुष्टात येऊ शकतो, अशा परिस्थितीत जर संघ व्यवस्थापनाने बुमराहला विश्रांती दिली तर तो अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी सुटकेचा नि:श्वास टाकू शकतो.

Edited By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टेबल टेनिसपटू मनिका बत्राने मनूला पराभूत करून सामना जिंकला