T20 विश्वचषक स्पर्धेची सुरुवात 1 जून पासून होणार असून आता या स्पर्धेला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी आहे. आता ही स्पर्धा दहशतवादी हल्ल्याचा छायेत आहे. वेस्टइंडीज ला दहशतवाद्यांनी हल्ला करण्याची धमकी दिली आहे. आता या प्रकरणावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) देखील कारवाईत आली असून कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी मजबूत सुरक्षा योजना तयार करण्यात आली आहे.
आयसीसीने तयारीचे आश्वासन दिले असून आयसीसीच्या प्रवक्त्याने सांगितले की, स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांची सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. सुरक्षा परिस्थितीला तोंड देण्यासाठी आमच्याकडे पुरेशी सुरक्षा योजना आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहो आणि यजमान देश आणि अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात अहो.कोणत्याही प्रकारच्या जोखमीचा सामना करण्यासाठी विस्तृत सुरक्षा उपाय योजले जात आहे.
पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या या जागतिक स्पर्धेत सर्वाधिक स्पर्धा वेस्ट इंडिजमध्ये होणार
आहेत, ज्यामध्ये भारताचाही समावेश आहे. ही स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये आयोजित केली जाणार आहे, परंतु बहुतेक सामने कॅरेबियनमध्ये खेळवले जाणार आहेत. ग्रुप स्टेजच्या काही सामन्यांव्यतिरिक्त सुपर एट टप्प्यातील सर्व सामने, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचे सामने वेस्ट इंडिजमध्ये होणार आहेत.
सुरक्षेचा कोणीही भंग करू नये यासाठी वेस्ट इंडिजमधील सहा ठिकाणांवरही कडक नजर ठेवण्यात येणार असल्याचे पंतप्रधान रॉले यांनी सांगितले . कोणत्याही धोक्याचा सामना करण्यासाठी आम्ही स्थानिक आणि प्रादेशिक स्तरावर तयार आहोत. आम्ही स्थानिक आणि प्रादेशिक स्तरावर अनेक धोक्यांपासून सावध राहतो आणि आमच्या गुप्तचर यंत्रणा आणि इतर सुरक्षा एजन्सी, एकट्या किंवा एकत्रितपणे, संपूर्ण स्पर्धेत देश आणि ठिकाणे लोकसंख्येचे संरक्षण करण्यासाठी कार्यरत आहेत.
वेस्ट इंडिजमध्ये सात ठिकाणी सामने खेळवले जातील, बार्बाडोस, गयाना, अँटिग्वा आणि बारबुडा, सेंट व्हिन्सेंट, सेंट लुसिया, ग्रेनेडाइन्स, त्रिनिदाद आणि टोबॅगो. अमेरिकेत फ्लोरिडा, न्यूयॉर्क आणि टेक्सासमध्ये सामने होणार आहेत.