आज IPL 2024 चा 67 वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. मुंबईने नाणेफेक जिंकून लखनौला प्रथम फलंदाजीची संधी दिली. केएल राहुलच्या सेनेने 20 षटकांत 6 गडी गमावून 214 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने 20 षटकांत 6 गडी गमावून 196 धावा केल्या. लखनौने मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव केला.
आयपीएल 2024 चा 67 वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. केएल राहुलच्या संघाने एमआयचा 18 धावांनी पराभव केला. या स्पर्धेत दोन्ही संघांचा प्रवास संपला. मुंबईचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
मुंबई इंडियन्स आठ गुणांसह गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने 14 पैकी 10 सामने गमावले.
लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने दमदार सुरुवात केली. सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि डेवाल्ड ब्रेविस यांनी पहिल्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली, जी नवीन-उल-हकने मोडली. त्याने नवव्या षटकात डेवाल्ड ब्रेविसला बाद केले. त्याला 20 चेंडूत 23 धावा करता आल्या. यानंतर सूर्या खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. तर रोहित शर्माने 68 धावा केल्या. त्याने 178.94 च्या स्ट्राईक रेटने 10 चौकार आणि तीन षटकार मारले.
या सामन्यात हार्दिक पांड्याने 16, नेहल वढेराने एक आणि इशान किशनने 14 धावा केल्या. नमन धीरने लखनौविरुद्ध स्फोटक कामगिरी केली. त्याने 26 चेंडूत झंझावाती अर्धशतक झळकावले. या सामन्यात तो 62 धावा करून नाबाद राहिला. त्याने 221.42 च्या स्ट्राईक रेटने चार चौकार आणि पाच षटकार मारले. रोमारियो शेफर्ड एक धाव घेत नाबाद राहिला. लखनौकडून रवी बिश्नोई आणि नवीन-उलहाकने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर कृणाल पंड्या आणि मोहसिन खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.