आज आयपीएलच्या 30व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना आरसीबीच्या होम ग्राउंड एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. सनरायझर्स हैदराबादने त्यांचे शेवटचे दोन सामने जिंकले आहेत आणि त्यांची नजर विजयाची हॅट्ट्रिक करण्यावर असेल
कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि दिनेश कार्तिक यांच्या शानदार खेळीनंतरही आरसीबी संघ सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय नोंदवू शकला नाही. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने ट्रॅव्हिस हेडचे शतक आणि हेनरिक क्लासेनच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत 3 बाद 287 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली. प्रत्युत्तरात आरसीबीनेही शानदार फलंदाजी केली, परंतु लक्ष्य इतके मोठे होते की संघ 25 धावांनी मागे राहिला. आरसीबीला 20 षटकात 7 विकेट्सवर केवळ 262 धावा करता आल्या. दोन्ही संघांमधील या सामन्यात एकूण 549 धावा झाल्या. सनरायझर्स हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सने 43 धावांत तीन बळी घेतले.