लेग स्पिनसाठी प्रसिद्ध युझवेंद्र चहलचालू मोसमात तो राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात केवळ एक विकेट घेत त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.युझवेंद्र चहलने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध कर्णधार ऋषभ पंतची विकेट घेतली. यासह त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 350 विकेट पूर्ण केल्या आहेत. T20 क्रिकेटच्या इतिहासात 350 विकेट घेणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.पियुष चावला 310 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.
चहलने चालू आयपीएल हंगामात चांगली कामगिरी केली आहे. या कारणास्तव त्याला 2024 च्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघातही स्थान मिळाले आहे.
युझवेंद्र चहलने टी-20 क्रिकेटमध्ये 301 सामने खेळून 350 विकेट्स घेतल्या आहेत, त्याने भारतीय संघाकडून खेळताना 96 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 201 विकेट आहेत.आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि आरसीबीकडून खेळला आहे.