Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खुशखबर! 5 रुपयात मिळेल अनलिमिटेड डेटा...

खुशखबर! 5 रुपयात मिळेल अनलिमिटेड डेटा...
टेलिकॉम ऑपरेटर व्होडाफोनने आपल्या इंडियन यूजर्ससाठी पॉकेट फ्रेंडली डेटा पॅक लाँच केला आहे. यात यूजर्स 1 तासासाठी 5 रुपयात अनलिमिटेड 2G डेटा वापरू शकेल. जाणून घ्या ऑफर..
 
या ऑफरमध्ये व्होडाफोन यूजर्स 5 रुपयांच्या रिचार्जमध्ये अनलिमिटेड 2G डेटा यूज करू शकेल. याची वैधता केवळ 1 तास असेल. हा ऑफर देशभरात लागू होणार आहे.
कसे करायचे अॅक्टिव्हेट : व्होडाफोनचा हा प्लान अॅक्टिव्हेट करण्यासाठी यूजरला *444*555#  किंवा *444*5# USSD कोड डायल करावे लागणार आहे. सध्या हा ऑफरचा पेपर टॉप-अप कार्ड प्रिंट करवण्यात आलेले नाही म्हणून यूजरला हे ऑफर घेण्यासाठी USSD कोड डायल करावा लागणार आहे.
 
एअरटेल आधीपासूनच देत आहे हा ऑफर: एअरटेल कंपनीने प्रीपेड यूजर्सला हा ऑफर मे पासून देत आहे. 'सायबर कॅफे डेटा पॅक' ची अधिक डिमांड लक्षात घेत कंपनीने 'सायबर कॅफे पेपर वाउचर' प्रस्तुत करण्याचा निर्णय घेतला आहे. 'सायबर कॅफे डेटा पॅक' मध्ये कंपनी 5 रुपयात 1 तासासाठी अनलिमिटेड 2G डेटा ऑफर करत आहे. हा ऑफर व्होडाफोनने लाँच केलेल्या ऑफरसारखाच आहे.
 
सध्या आपला रेवेन्यू वाढविण्यासाठी सर्व सर्व्हिस प्रोव्हाइडर कंपन्या फर्स्ट टाइम डेटा यूजर्स आणि ग्रामीण यूजर्सला टार्गेट करत आहे. उल्लेखनीय आहे की भारतातील अनेक शहर आणि गावांमध्ये सध्या 3G इंटरनेट सुविधा नसल्यामुळे यूजर्स 5 रुपयात डेटा लिमिटची काळजी न करता इंटरनेट एक्सप्लोर करू शकतील.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रात पावसानं थैमान; 15 बळी