Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जगातील पहिला लिक्विड कूलपॅड

जगातील पहिला लिक्विड कूलपॅड
तायवानची टेक कंपनी आसूसने भारतात जगातील पहिला लिक्विड कूल्ड लॅपटॉप रिपब्लिक ऑफ गेमर्स (ROT) GX 700 लाँच केला. याची किंमत 4,12,990 रुपये आहे. कंपनीने सांगितले की, हा लॅपटॉप नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे बनवण्यात आला असून यामध्ये डिटॅचेबल आरओजी हायड्रो ओव्हर लॉकिंग कुलिंग मॉडय़ूल आहे. यामुळे याचा कीबोर्ड आणि मॉनिटर वेगळा करता येऊ शकतो. हा लॅपटॉप 6G च्या इंटल मोबाइल के-एसकेयू (स्कायलेक) प्रोसेसरने लॅस आहे.
 
हा लॅपटॉप विशेष आरओजीची थीम अटॅचीमध्ये पॅक आहे. यात हायड्रो ओव्हर लॉकिंग (ही कॉम्प्युटर हार्डवेअरची स्पीड वाढवणारी संरचना आहे) यामध्ये केवळ लॅपटॉपला थंड ठेवण्याचीच क्षमता नसून यामुळे ओव्हर लॉकिंगला अधिक सक्षम बनवते. हा लॅपटॉप 48% आपला स्पीड वाढवू शकतो. तसेच याची 64 जीबी डीडीओर 4 मेमरी 43% ओव्हर लॉक करू शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एक अनोखा विश्वविक्रम: 14 पुरुषांपासून 14 मुलं