Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तरुणाने केले चक्क स्मार्टफोनशी लग्न!

तरुणाने केले चक्क स्मार्टफोनशी लग्न!
, शनिवार, 16 जुलै 2016 (06:59 IST)
अमेरिकेतील लास वेगासमध्ये एका व्यक्तीनं चक्क स्मार्टफोनशी लग्न केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार ही माहिती देण्यात आली आहे.
 
जसा लग्नसोहळा असतो तसाच हा लग्न सोहळादेखील पार पडला. फक्त एकाच गोष्टीमध्ये फरक होता. नवरा मुलगा एरॉन चेर्वेनाकनं लग्नासाठी खास ड्रेस परिधान केला होता. पण त्याची ‘नवरी’ एका डब्यात बंद होती. लास वेगास रिव्ह्यू जर्नलमध्ये ही बातमी प्रकाशित करण्यात आली आहे. 
 
लिटील वेगास चॅपलच्या पादरीनं लग्नाच्या विधी पार पाडताना चेर्वेनाकला विचारलं की, ‘एरॉन तू या स्मार्टफोनला कायद्यानं पत्नी मानतोस? तू तिच्यावर प्रेम करतोस? तिचा सन्मान करतोस?’ त्यावर त्यानं उत्तर दिलं की, ‘होय मी असं करतो.’

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाकिस्तान विविध दहशतवादी‘काळा दिवस’ : भारताने पाकला खडसावले