Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतात गॅलक्सी नोट-7ला नागरी उड्डाण मंत्रालयानं केली विमान प्रवासात बंदी

भारतात गॅलक्सी नोट-7ला नागरी उड्डाण मंत्रालयानं केली विमान प्रवासात बंदी
, सोमवार, 12 सप्टेंबर 2016 (12:21 IST)
जगभरात खबरदारी म्हणून विमान आणि इतर नागरी व्यवस्थापन असलेल्या ठिकाणी गॅलक्सी नोट-7ला वापरण्यास आणि बाळगण्यासाठी बंदी घातली आहे. तर आपल्या भारत सरकारनं नुकताच लाँच केलेला स्मार्टफोन गॅलक्सी नोट-7ला नागरी उड्डाण मंत्रालयानं विमान प्रवासात बंदी घातली आहे. विमान प्रवास करताना हा फोन वापरु नये किंवा चार्जिंगही करु नये असा सल्ला सरकारकडून देण्यात आला आहे.  विमानात कोणताही अपघात होऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. 
 
या प्रकारानंतर अमेरिका फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशननं विमान प्रवासात या फोनच्या वापरावप बंदी घातली. त्यानंतर भारत सरकारनंही कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी अशाच पद्धतीचं पाऊल उचललं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सॅमसंग परत मागवतेय गॅलक्सी नोट-7 मोबाईल