Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लेनोव्होचा पहिला फ्लेक्सिबल स्मार्टफोन!

लेनोव्होचा पहिला फ्लेक्सिबल स्मार्टफोन!
, सोमवार, 13 जून 2016 (09:07 IST)
लेनोव्होनं आपल्या टेक वर्ल्ड 2016 च्या इव्हेंटमध्ये आपले सगळे नवीन प्रोडक्ट लाँच केले. कंपनीनं मोटो झेड आणि झेडफोर्स या स्मार्टफोनसह काही खास डिव्हाइसचीही झलक पेश केली. ज्यावर अद्याप कंपनी काम करीत आहे. यामध्ये त्यांनी फ्लेक्सिबल स्मार्टफोन आणि एक विशेष टॅबलेटबाबत घोषणा केली. या इव्हेंटमध्ये नवा प्रोटोटाइप स्मार्टफोन आणि फोलियो टॅबलेटदेखील घोषणा केली. दरम्यान हा स्मार्टफोन नेमका कधी लाँच करण्यात येणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. याआधी चीनच्या एका स्टार्टअप कंपनीनंदेखील फोनल्डेबल स्मार्टफोन प्रोटो टाइप दाखवला होता. या वर्षाच्या शेवटी हा स्मार्टङ्खोन लाँच करण्याची घोषणा केली आहे. हा स्मार्टफोन तसा दिसायला साधारण दिसतो. मात्र त्याला फोल्ड करुन तुम्ही मनगटावर बांधू शकतात. हातावर घडय़ाळ ज्याप्रमाणे आपण बांधतो त्याचप्रमाणे हा स्मार्टफोन तुम्हाला बांधता येतो. त्यामुळे या स्मार्टङ्खोनला लेनोव्हाचा हा स्मार्टफोन टक्कर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेएनयू : देशविरोधी घोषणांचे व्हिडिओ खरे