Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वायफाय पासवर्ड शोधणाणे पाच अँप

वायफाय पासवर्ड शोधणाणे पाच अँप
स्मार्टफोनच्या या युगामध्ये 2जी,3जी आणि वायफायच्या मदतीनं इंटरनेटचा वापर होत आहे. कित्येक वेळा आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला वायफायचं नेटवर्क तर दिसतं, पण बरेच वेळा हे नेटवर्क पासवर्डनं सिक्युअर्ड असतं. सध्या गुगल प्ले वर अशी काही अँप्स उपलब्ध आहेत ज्यामुळे तुम्हाला त्या वायफायचा पासवर्ड मिळेल आणि तुम्ही वायफायवरून इंटरनेटचा वापर करु शकाल. 
बेस्ट वायफाय नेटवर्क हॅकर
हे अँप बनवणार्‍या कंपनीनं कोणत्याही प्रकारचा वायफायचा पासवर्ड क्रॅक करण्याचा दावा केला आहे. कोणत्याही ओपन किंवा क्लोज वायफाय नेटवर्क हॅक करण्यासाठी याचा वापर सर्रास होत आहे. 
 
हाऊ टू हॅक वायरलेस नेटवर्क
हे अँप ऑनलाइन टुटोरियलसारखं आहे. यामध्ये तुम्हाला एथिकल हॅकिंग टिप्स आणि ट्रीक्स शिकवण्यात येतात. तसंच वायफाय प्रोटेक्शनसाठी बनवण्यात आलेल्या सिक्युरिटी अल्गोरिथमला हॅक करणं शिकवलं जातं. 

वायफाय हॅकर
हे अँप इन्स्टॉल केल्यावर कोणत्याही वायफायच्या ओपन नेटवर्कच्या रेंजमध्ये जा. वायफायला असलेला पासवर्ड मिळवण्यात तुम्हाला या अँपची मदत होईल. 
webdunia
हॅक वायफाय पासवर्ड
हे अँप इन्स्टॉल केल्यानंतर काही सेकंदांमध्येच तुम्हाला वायफायला असलेला पासवर्ड मिळू शकतो. आतापर्यंत दहा लाखांपेक्षा जास्त जणांनी हे अँप इन्स्टॉल केलं आहे. हे अँप गुगल प्लेवर फ्रीमध्ये उपलब्ध आहे.
 
फाईंड माय राऊटर्स पासवर्ड
डिफॉल्ट पासवर्ड रिकव्हरी, मॅन्युअल पासवर्ड रिकव्हरी आणि डिक्शनरी पासवर्ड रिकव्हरीसारखे फंक्शन या अँपमध्ये देण्यात आले आहेत. तुम्ही नवीन राऊटर घेतला असेल आणि त्याचा पासवर्ड तुम्हाला माहीत नसेल तर हे अँप नक्कीच तुमच्या उपयोगाचं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नासाच्या स्पर्धेत मुंबई अव्वल