आपल्या मोबाइलमध्ये असे काही गोपनीय फोटो, फाइल्स असतात ज्या दुसर्यांना दिसल्यास गहजब उडू शकतो. त्या लपवण्यासाठी जशी अॅप असतात तशीच गोपनीय अॅपही लपविण्यासाठी आहेत. अॅपचा अॅक्सेस एखाद्याला मिळाल्यास त्यामुळे तुमची गोपनीय माहिती उघड होऊ शकते. यामुळे अशी अॅप लपवूही शकणार आहात.
यासाठी प्लेस्टोअरवरून अॅपेक्स लॉन्चर फोनमध्ये डाऊनलोड करावा लागणार आहे. या अॅपची साईज 10एमबीपेक्षा कमी असेल. आपल्या फोनवर आधीच मोबाइल कंपनीचा लॉन्चर असतो. अॅपेक्स लॉन्चरवर क्लिक केल्यानंतर आधीचा लॉन्चर बदलेल. यानंतर अॅपेक्स सेटिंगमध्ये जाऊन सहाव्या नंबरवर हिडन अॅपचा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर अॅड असा ऑप्शन येईल. त्यावर गेल्यानंतर तुमच्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल असलेल्या अॅपची यादी येईल. यानंतर तुम्हाला हवी असलेली अॅप निवडून ओके बटनवर क्लिक करावे.
लपवलेली अॅप परत पाहायची असतील तर पुन्हा अॅपेक्स सेटिंगमध्ये जाऊन अनहाईड अॅप असा पर्याय क्लिक करावा व बाहेर पडावे.