सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची कंपनी बीएसएनएलनं आपली 5जी सेवा लॉन्च करण्याची तयारी चालवली आहे. तसंच 4जी VoLte सेवाही लवकरच बीएसएनएलकडून दिली जाणार आहे. बीएसएनएलचे संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी आपल्या आगामी योजनांची माहिती दिली. यात मागच्याच वर्षी बीएसएनएलनं सरकारकडे 700 मेगाहर्टझच्या स्पेक्ट्रमची मागणी केली होती. लवकरच 4G VoLte आणि 5जी साठी बीएसएनएलला स्पेक्ट्रम मिळण्याची शक्यता आहे. त्यासंबंधीची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असल्याचे सांगितले आहे.
स्पेक्ट्रम खरेदी करण्यासाठी बीएसएनएलला सर्वात जास्तीच्या बोलीच्या किंमतीची बरोबरी करावी लागेल. मात्र ऑक्शनमध्ये भाग घेण्याची बीएसएनएलला आवश्यकता असणार नाही.