Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोशल मीडियावर थक्क करणाऱ्या कॅट वॉकची चर्चा

सोशल मीडियावर थक्क करणाऱ्या कॅट वॉकची चर्चा
, मंगळवार, 17 सप्टेंबर 2019 (10:26 IST)
सोशल मीडियावर एका देसी मोजिटो नावाच्या ट्विटर अकाऊंटवर मांजरींचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मांजरींनी छानसे कपडे परिधान केले आहेत. एका मांजरीने तर साडी नेसल्याचे दिसत आहेत तर दुसरीने फ्रॉक घातला आहे. वेगवेगळ्या पोशाखांमधील या मांजरी खूप छान रॅम्प वॉक करत असल्याचे दिसत आहे. 
 
हा व्हिडीओ शेअर करत ‘हा सर्वात क्यूट व्हिडीओ आहे, जो तुमच्यासाठी प्रदर्शित करत आहोत’ असे लिहिले होते. सध्या या मांजरींचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेक ट्विटर यूजर्सने कमेंट केल्या आहेत.  
 
आघाडी 125-125 जागांवर निवडणूक लढवणार 
 
भाजपा-शिवसेनेने आपला जागावटपाचा कार्यक्रम गुलदस्त्यात ठेवला असला आहे. मात्र  कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी राज्यात 125-125 जागांवर निवडणूक लढवेल असे राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे. नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
 
इतर जागा आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांना देतील तसेच दोन्ही पक्षांच्या 15 ते 20 जागांमध्ये फेरबदल होऊ शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात विधानसभा निवडणुकींच्या जागावाटपासंदर्भात कॉंग्रेस हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. सत्तेत असलेल्या भाजपा-शिवसेनेचा विजय रोखण्यासाठी यावेळी चर्चा झाली. राज्याच्या निवडणुकीला केवळ 2 महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘नमो’ अ‍ॅपचे नवे व्हर्जन सादर, आणखी काही फीचर्स जोडले