Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

FACEBOOK ने आत्महत्या थांबवण्यासाठी कठोर केले धोरण

FACEBOOK ने आत्महत्या थांबवण्यासाठी कठोर  केले धोरण
, शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019 (14:09 IST)
विश्व आत्महत्या प्रतिबंध दिवसानिमित्त फेसबुकने सेल्फ हार्म, आत्महत्या व इटिंग डिसऑर्डरला घेऊन आपले धोरण कठोर केले आहे आणि आपल्या सेफ्टी पॉलिसी टीममध्ये एक स्वास्थ्य व कल्याण विशेषज्ञाला नियुक्त करण्याची घोषणा केली आहे. फेसबुक, ग्लोबल हेड ऑफ सेफ्टी एंटीगोन डेविस यांनी मंगळवारी एका ब्लॉग पोस्टामध्ये लिहिले, “या वर्षाच्या सुरुवातीत आम्ही आत्महत्या आणि स्वत:ला इजा पोहोचवण्या (सेल्फ हार्म)शी निगडित काही जास्त कठीण विषयांवर चर्चा करण्यासाठी जगभरातील विशेषज्ञांसोबत नियमित सल्लामसलतचे आयोजन सुरू केले. यात सुसाइड नोट ते, ऑनलाईन दुख:द कंटेटच्या जोखिमीपासून कसे बचाव करावे, हे सामील आहे.”
 
सोशल मीडियातील दिग्गज कंपन्या काही वर्षांपासून आत्महत्याच्या प्रतिबंधच्या उपायांवर काम करत आहे आणि 2017 मध्ये याने आपल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआई) आधारित आत्महत्या प्रतिबंध साधनांना सादर केले. डेविसने म्हटले, “आम्ही या सामुग्रीला कसे हँडल करू, यावर सुधार करण्यासाठी काही बदल करण्यात आले आहे. आम्ही सेल्फ हार्मला नकळत जाहिरात करणे आणि बचाव करण्यासाठी ग्राफिक कटिंग फोटोजची अनुमती नाही देण्यासाठी धोरण कठोर केले आहे.” फेसबुकचे स्वामित्व असणारे इंस्टाग्रामने या वर्षापासून सेल्फ हार्म चित्रांना 'सेंसटिविटी स्क्रीन'च्या मागे लपवणे सुरू केले आहे.  फोटो शेयरिंग प्लेटफार्म सेल्फ हार्म कंटेंटला आपल्या 'एक्सप्लोर टॅब'वर येण्यापासून रोखते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'मी माझ्या सासूच्या पार्थिवाला खांदा दिला, कारण...'