Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Facebook वर नाही दिसणार Likes ची संख्या, Tag करण्यासाठी सुचवणार नाही

Facebook वर नाही दिसणार Likes ची संख्या, Tag करण्यासाठी सुचवणार नाही
Facebook वर आपल्या पोस्टवर मिळणार्‍या Likes ची संख्या आता सोशल मीडिया साईटवर इतर मित्रांना आणि यूजर्सला बघायला मिळणार नाही. फेसबुकने ही माहिती दिली आहे की आता इतर लोकं आपले लाइक्स बघू शकणार नाही आणि Tag suggestions फीचर देखील बदलण्यात आले आहे.
 
फेसबुकप्रमाणे या प्रकाराचे बदल फोटो, व्हिडिओ आणि कमेंट्सवर मिळणार्‍या Likes ची संख्येत रुची संपवेल आणि लोकं पोस्टावर अधिक लक्ष देतील.
 
फेसबुकच्या मालकी हक्क असणार्‍या ‘इंस्टाग्राम’ ने या वर्षीच्या सुरुवातीला घोषणा केली होती की ते व्हिडिओ पाहणार्‍यांची संख्या आणि त्याला लाइक करणार्‍यांची संख्या किमान 6 देशांपासून लपवण्याचा प्रयोग करत आहे, जिथे खातेदार लाइक्सची संख्या तर बघू शकतात परंतू इतर लोकांना ते दिसणार नाही. सोशल नेटवर्किंग साईटच्या एका प्रवक्त्याने सांगितले की आम्ही Facebook वरील लाइक्स ची संख्या प्रदर्शित न करण्यावर विचार करत आहे.
 
Tag suggestions फीचर हटणार: फेसबुकने फोटो अपलोड केल्यावर चेहरा ओळखणार्‍या त्या सॉफ्टवेअरला वापरणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे जे यूजर्सला Tag suggestions देतं होतं.
 
फेसबुकने सांगितले की ते ‘Tag’ संबंधी सल्ला देण्याऐवजी चेहरा ओळखणारी अशी सेटिंग प्रदान करणार जे केवळ टॅग करण्यासाठी नव्हे तर विविध वापरासाठी फोटोमध्ये लोकांचा चेहरा ओळखेल.
 
फेसबुक यूजर्सला ‘टॅग सजेशन’ च्या फीचरऐवजी आता ‘फेस रिकग्निशन सेटिंग’ पर्याय मिळेल, ज्याला ‘ऑन किंवा ऑफ’ करता येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

5 सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे रिलायंस Jio फायबर, जाणून घ्या कसे कराल रजिस्ट्रेशन