Reliance Jio Fiber जिओ फायबर 5 सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे. जिओ फायबरचे प्लान 700 रुपयांपासून सुरू होईल. मुकेश अंबानी यांनी एजीएममध्ये सांगितले होते की जिओ फायबर सर्विस 5 सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे. जिओ फायबर प्लान 700 रुपयांपासून सुरू होईल. याची स्पीड 100 एमबीपीएस असेल.
जिओ गीगा फायबरचे प्लान्स
- जिओ गीगा फायबर कमर्शियलरूपेण 5 सप्टेंबर 2019 रोजी लाँच होणार आहे.
- गीगाफायबर, 100MBPS ची स्पीडने सुरू होऊन 1GBPS पर्यंतच्या स्पीडमध्ये उपलब्ध होईल.
- जिओफायबरचे प्लान्स 700 रुपयांपासून सुरू होऊन 10,000 रुपयांपर्यंत राहणार आहे.
- जिओ फाइबर सर्विसचा सर्वात स्वस्त प्लान 700 रुपयांपासून सुरू होईल. टॉप प्लान 10,000 रुपये एवढा असेल.
- येथे वॉयस कॉल्स फ्री मिळतील.
- जिओ फायबर सोबत OTT ऐप्सचे ऐक्सेस मिळेल.
- प्रीमियम जिओ फायबर कस्टमर्सला पहिल्याच दिवशी मू्व्ही बघण्याचा विकल्प देईल.
रजिस्ट्रेशन
जिओ गीगा फायबरचे रजिस्ट्रेशन 15 ऑगस्टपासून सुरू झाले आहे. ज्या ग्राहकांना या ब्रॉडबँड सर्विसची बुकिंग करायची असेल, ते कंपनीच्या आधिकारिक वेबसाइट jio.com किंवा My Jio App हून करू शकतात.