Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतीय भाषेत इमेल आयडी बनवण्याची सोय

भारतीय भाषेत इमेल आयडी बनवण्याची सोय
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने मायक्रोसॉफ्टने  भारतीयांना खूषखबर दिली आहे. मायक्रोसॉफ्ट ग्राहकांना आता भारतीय भाषेत इमेल आयडी बनवण्याची सोय खुली करून देणार आहे. त्यानुसार आता भारतीय भाषांमध्ये मेल पाठवण्याची आणि स्वीकारण्याची सोय खुली होणार आहे. ऑफीस ३६५, आऊटलूक २०१६, आऊटलूक डॉट कॉम, एक्सचेंज ऑनलाइन, एक्सचेंज ऑनलाइन प्रोटेक्शन यांसारख्या अॅप्लिकेशनवर ही सोय खुली होणार आहे.
 
मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरूवातीच्या टप्प्यामध्ये हिंदी, बोडो, डोगरी, कोकणी, मैथिली, मराठी, नेपाळी, सिंधी, बंगाली, गुजराती, मणिपुरी, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांमध्ये इमेल आयडी बनवण्याची सोय खुली लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जगातील सर्वोत्तम लढाऊ विमान