Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'या' गोष्टी चुकूनही Google वर 'सर्च' करू नका, अन्यथा...

webdunia
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020 (13:12 IST)
आजचा काळ हा गुगल (Google) चा आहे. आपल्याला काही सर्च करायचे असल्यास आपण थेट गुगलला विचारतो. बर्याच वेळा लोक गुगलवर खूप विचित्र गोष्टी शोधतात. जर आपणही गुगलवर काहीना काही सर्च करत असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे. गुगलवर सर्च करताना अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण गुगलवर अजिबात सर्च करू नयेत.
 
या गोष्टी अशा आहेत ज्यांना सर्च केल्याने आपण मोठ्या अडचणीत येऊ शकता. परिणामी आपल्याला जेलमध्ये देखील जावे लागू शकते. गुगलवर कधीही बॉम्ब बनविण्याची पद्धत शोधू नका. जर आपण असे केले असेल तर आपल्याला तुरूंगात जावे लागू शकते. आपण गुगलवर बॉम्ब बनवण्याच्या पद्धतीचा शोध घेताच, कंपनी आपला अॅलड्रेस सुरक्षा एजन्सींना पाठवेल. यानंतर लगेचच सुरक्षा यंत्रणा सतर्क होतील. सुरक्षा एजन्सी आपल्याविरूद्ध त्वरित कारवाई करू शकतात आणि आपल्याला जेलमध्ये जावे लागू शकते.
 
तसेच, गुगलवर (Google) कधीही औषधे सर्च करू नका. जर आपली तब्येत खराब असेल आणि आपण गुगलवर औषधे सर्च करून ती खाल्ल्यास आपण आजारी देखील पडू शकता. कधीकधी चुकीची औषधे घेतल्यास आपले आरोग्य अधिक प्रमाणात बिघडू शकते. जर आपण एखादे प्रॉडक्ट वापरत असाल आणि अडचणीच्या वेळी ग्राहक सेवेला कॉल करण्यासाठी गुगलवरून नंबर शोधत असाल तर आपण बर्या्च वेळा मोठ्या संकटात अडकू शकता. गुगलवर सायबर क्राइम हॅकर्स कोणत्याही कंपनीचा बनावट हेल्पलाईन नंबर फ्लोट करतात. अशा परिस्थितीत जेव्हा आपण चुकून त्या नंबरवर कॉल करता तेव्हा आपला नंबर हॅकर्सपर्यंत पोहोचतो.
 
तुमच्या नंबरवर ऑनलाईन बँकिंग (online banking)सारखी सुविधा असल्यामुळे हॅकर्स तुमच्या नंबरच्या माध्यमातून तुमच्या खात्यातून पैसे काढू शकतात. याशिवाय, सिम स्वॅप (SIM Swap) सारख्या गोष्टी आपल्यासोबत केल्या जाऊ शकतात. तसेच, गुगल वर कधीही आपला वैयक्तिक ईमेल सर्च करू नका. असे केल्याने आपले खाते हॅक होऊ शकते आणि आपला पासवर्ड देखील लिक होऊ शकतो.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

राष्ट्रीय शिबिर अर्ध्यावर सोडून पी.व्ही. सिंधू पोहचली ‘लंडन’