Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुलीच्या नावे खोटे फेसबुक अकाऊंट लुटले पाच लाखांना

मुलीच्या नावे खोटे फेसबुक  अकाऊंट लुटले पाच लाखांना
, मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018 (09:30 IST)

फेसबुकने जाहीर केले की जगात २० कोटी फेसबुक खाती ही खोटी आहेत. याचीच प्रचीती मुंबई येथे आली आहे. दोघातील पार्किंगच्या वादातून एकाने मुलीच्या नावाने फेसबुक अकाऊंट तयार केले तर ज्याच्यासोबत वाद झाला त्यला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मैत्री केली होती. मग विश्वास जिंकून त्याला त्यानंतर एका ठिकाणी बोलावून  बेदम मारहाण तर केलीच सोबत  5 लाख रुपये लुटले आहे. ही  घटना चेंबूरमध्ये घडली आहे. चेंबूरच्या गव्हाणपाडा परिसरात राहत असलेल्या हितेंद्र उर्फ बाबू ठाकूर याचा डेकोरेशनचा व्यवसाय आहे. त्याला ८ जानेवारी रोजी  अनोळख्या मुलीची फेसबुक फ्रेण्ड रिक्वेस्ट आली होती. मुलगी मग नाही कोण म्हणतय मग काय त्याने  स्वीकारली . मग  दोघांचेही फेसबुक मेसेंजरवर बोलणे सुरू झाले. त्यात त्या मुलीने त्याला  गोवंडी येथे भेटण्यासाठी बोलावले होते. मुलगी बोलावतेय हे पाहून  ठाकूरही तेथे वेळेत हजर झाला. त्याला इथे एक लांबून मुलीने हात दाखवून त्याला जवळ बोलावल होते . त्याला वाटले की  तीच मुलगी आहे,  तो जवळ गेला. तेव्हा पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्याला लोखंडी रॉड आणि स्टंपने चोप त्याला चांगलाच दिला आहे. तर त्याच्याकडील ५ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज लुटला आहे.  घटनेची माहिती मिळताच च देवनार पोलिसांनी ठाकूरच्या तक्रारीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल केला. यावरून पोलिसानी 3 जणांना अटक केली. इतर आरोपी फरार आहे. अतर्गत वादातून हे प्रकरण घडले होते. तेव्हा कोणी फेसबुकवर अनोळखी असेल तर दोनदा विचार करा.

 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लहान बालिकेने १० रुपयांचा कॉईन, दुर्दैवी मृत्यू