Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ट्रम्प यांच्या पोस्टवर आक्षेप घेणार्‍या कर्मचार्‍यास फेसबुकने काढून टाकले

ट्रम्प यांच्या पोस्टवर  आक्षेप घेणार्‍या कर्मचार्‍यास फेसबुकने काढून टाकले
, शनिवार, 13 जून 2020 (14:45 IST)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टचे  फैक्ट चेकन केल्याचा निषेध करणार्‍या कर्मचार्‍यास फेसबुकने  बाहेरचा मार्ग दाखविला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका भडकवू  पोस्टावर कारवाई न करण्याच्या फेसबुक सीईओ मार्क झुकरबर्गच्या निर्णयावर कर्मचार्‍याने गेल्या महिन्यात टीका केली होती.
  
फेसबुकने ज्या कर्मचार्‍यास हटवले आहे त्याचे नाव ब्रॅंडन डॉल आहे, जो फेसबुकवर यूजर इंटरफेस इंजिनियर म्हणून काम करत होता. ब्रॅंडन यांनी ट्विट केले असून असा दावा केला आहे की, ब्लॅक लाइव्हसं मॅटर चळवळीच्या समर्थनार्थ आपल्या वक्तव्याचा समावेश करण्यास नकार देणार्‍या एका सहकायाला जाहीरपणे फटकारण्यासाठी त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. फेसबुकने डेलच्या बरखास्तीची पुष्टी केली आहे परंतु त्याला बरखास्तीच्या कारणांविषयी कोणतीही माहिती दिली नाही.
 
पोलिस कोठडीत जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूबद्दल ट्रम्प यांनी मिनियापोलिसमध्ये निदर्शनांवर एक ट्विट जारी केले, यावर  ट्विटरने चेतावणी बजावली, पण त्याच पोस्टावर फेसबुकने म्हटले आहे की हे पोस्ट कंपनीच्या धोरणाचे उल्लंघन करत नाही. फेसबुकच्या या निर्णयाला काही फेसबुक कर्मचार्‍यांनी विरोध दर्शविला होता आणि त्यावर ते “लाजिरवाणे”असल्याचे सांगितले.
 
ट्विटरच्या तथ्या तपासणीनंतर खासगी कंपन्यांनी असे करू नये अशी टीका मार्क झुकरबर्ग यांनी एका मुलाखतीत ट्विटरवर केली होती. झुकरबर्गच्या वक्तव्यानंतर फेसबुक कर्मचार्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून अनेकांनी अक्षरशः काम करण्यास नकार दिला आहे. अनेक कर्मचार्‍यांनीही फेसबुकच्या  कंटेंट धोरणात बदल सुचवले होते.
 
या निषेधानंतर झुकरबर्गने फेसबुकच्या धोरणांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी फेसबुकच्या धोरणांचा आढावा घेण्याची गरज भासल्यास बदलही करणार असल्याचे एका पोस्टामध्ये म्हटले होते. त्यांनी आपल्या पोस्टामध्ये ब्लॅक लाइव्ह्स मॅटर चळवळीला पाठिंबा दर्शविला, 'ते ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर चळवळीचे समर्थन करतात आणि लवकरच कंपनीच्या धोरणांचा आढावा घेण्यास सुरुवात करतील. देशातील पोलिस दलाच्या विरोधात आणि देशातील नागरी हिंसाचाराच्या चळवळीच्या धोरणांच्या आढाव्यावर आम्ही भर देऊ.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

80 वर्षांच्या नराधमाने दोन अल्पवयीन बहिणीवर केले अत्याचार