फेसबुकने भारतामध्ये नवे फिचर आणले आहे. यामाध्यमातून आवडीचे सामान खरेदी करु शकता किंवा नको असलेले सामान विकूही शकता येणार आहे 'मार्केटप्लेस' फिचर मुंबईत ट्रायल बेसिसवर सुरु केले आहे. जर इथले ट्रायल यशस्वी झाले तर देशभरातील फेसबुक युजर्ससाठीही खुले केले जाणार आहे.
फेसबुकच्या मार्केटप्लस फीचरचा वापर करुन प्रोडक्टसाठी जाहिरात देता येऊ शकते. दुसऱ्यांनी टाकलेल्या जाहिरातीच्या पोस्टही सर्च करु शकतात. ओएलएक्स आणि क्विकर याप्रमाणेच हे फिचर काम करणार आहे. मार्केटप्लस हे फिचर सध्या अमेरिकेसह २५ देशांमध्ये अस्तित्वात आहे. १७ देशांमध्ये विकसित झाले असून यामध्ये जर्मनी, फ्रान्स आणि यूके यांचा समावेश आहे.
फेसबुक अॅप्सच्या तळाशी 'शॉप' नावावर क्लिक करु शकता. जी वस्तू विकायची आहे तो फोटो अपलोड करु शकता. त्यानंतर इच्छुक ग्राहक तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. हाऊस, इलेक्ट्रॉनिक्स अशा कॅटगरीमध्ये सिलेक्ट करु शकता. कंपनीतर्फे पेमेंट आणि डिलीव्हरीही करता येणार आहे. पैशांचा व्यवहार थेट फेसबूकशीच होणार असल्याने मध्ये पैसे कट होणार नाहीत.