फेसबुकने आपल्या अप मध्ये एक नवीन फीचर समाविष्ट केले आहे.आता अॅप्स न उघडता युजर्स व्हिडीओ किंवा ऑडिओ कॉल करू शकतील.फक्त काहीच युजर्स या फीचरचा वापर करू शकतात.चाचणी पूर्ण झाल्यावर कोणीही हे वापरू शकेल.
फेसबुक आपल्या सेवेत आणखी एक नवीन वैशिष्ट्य जोडत आहे.ऑडियो आणि व्हिडीओ कॉलिंग .या मध्ये युजर्स मेसेंजर अॅप्स न उघडता व्हिडीओ किंवा ऑडिओ कॉल करू शकतील.सध्या याची चाचणी करण्यात येत आहे. यशस्वी झाल्यावर हे फेसबुकवर वापरण्यात येईल.म्हणजे युजर्स आता कोणत्याही मेसेंजर अॅप्स ला न उघडता व्हिडीओ किंवा ऑडिओ कॉलिंग करू शकतील.
सध्या फेसबुकचे मेसेंजर म्हणून एक स्वतंत्र अॅप्स आहे हे मेसेंजर अॅप्स फेसबुकने 2014 साली बनवले होते.24 ऑगस्ट पासून काही युजर्स फेसबुक अॅप्स ने व्हिडीओ आणि ऑडिओ कॉल करू शकतील.
सध्या युजर्सला मेसेज पोस्ट करण्यासाठी स्वतंत्र अॅप्स उघडावे लागते परंतु या वैशिष्ट्यामुळे पुन्हा पुन्हा अॅप्स उघडावे लागणार नाही.कंपनी फेसबुकचे सर्व अॅप्स आणि सेवा एकत्र करण्याच्या प्रयत्नात आहे. या मध्ये युजर्स कोणतेही अॅप्स डाऊन लोड न करता कॉलिंग आणि मेसेजिंग करू शकतात.