Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 21 April 2025
webdunia

फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया

flipkart jobs
, शनिवार, 24 मार्च 2018 (09:16 IST)

फ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० जागांसाठी होणार आहे. फ्लिपकार्टने हैदराबाद आणि बंगळुरु येथील इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या २० विद्यार्थ्यांना ऑफर लेटरही पाठवलं आहे. या विद्यार्थ्यांची निवड कॅम्पस प्लेसमेंट दरम्यान करण्यात आली होती.

फ्लिपकार्ट कंपनीने ज्या विभागात भरती प्रक्रिया सुरु केली आहे त्यापैकी बुतांश हे टेक्नोलॉजी विभागातील आहेत. कंपनीने या विभागात डेटा सायंटिस्ट (शास्त्रज्ञ), UI आणि UX डिझायनर्स, प्रोडक्ट इंजिनिअर्स, टेक प्रोग्राम मॅनेजर, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, आयटी इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व्हिस डिलिव्हरी आणि आयटी अॅप्लिकेशन यांचा समावेश आहे. कंपनीने यापूर्वी आयआयटी आणि आयआयएमच्या ऐवजी इतर संस्थांमधून कॅम्पस प्लेसमेंट केलं होतं. कंपनीने ५० डेटा सायंटिस्टही भरती केले आहेत.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जया बच्चन सलग चौथ्यांदा राज्यसभेत