Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुगलच्या मदतीने पुणे बनणार वाय-फाय सिटी

गुगलच्या मदतीने पुणे बनणार वाय-फाय सिटी
पुणे- गुगलने पुणे स्मार्ट सियी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे जा‍हीर करण्यात आलेली वाय-फाय डील मिळवली आहे. या कराराअंतर्गत गुगल पुणे शहरामध्ये वाय-फाय सुविधा पुरवणार आहे. यासाठी गुगल आयबीएमल एल अँड टी आणि रेलटेल यांच्यासोबत काम करणार आहे. या कराराअंतर्गत गुगल आपले गुगल स्टेशन प्लॅटफॉर्म जाळे शहरात उभारणार आहे. गुगल स्टेशन प्लॅटफॉर्ममुळे सार्वजनिक ठिकाणशंवर वाय-फाय ‍नेटवर्क मिळण्यामध्ये मदत मिळेल. विशेष म्हणजे गुगल स्टेशन मिळवणारे पुणे जगातील पहिले शहर असणार आहे. 6 जानेवारी रोजी हा कारार करण्यात आला आहे.
 
सर्व सार्वजनिक ठिकाणांना वाय-फाय हॉटस्पॉटच्या माध्यामातून एकत्रित आणणे, आणि त्यासाठी फक्त एकदाच प्रमाणीकरण करायला लागावे हा या स्मार्ट सिटी मिशनचा मुख्य उद्देश्य अस्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले आहे.
 
यासाठी गुगलसोबत 150 कोटींचा करार करण्यात आला असून यामध्ये भांडवली खर्च, ऑपरेटिंग खर्च आणि महसूल संबंधित खर्चांचा समावेश असेल, अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाटलीत बसू शकते तरुणी