मोदी सरकारने ५९ चिनी अॅपवर बंदी घालत डिजिटल स्ट्राईक केला. आता बॅन करण्यात आलेल्या अॅपना गुगलनेही दणका दिला आहे. मोदी सरकारने बॅन केलेली ही अॅप गुगलने तात्पुरी ब्लॉक केली आहेत. कारण सरकारने बंदी घालूनही ही अॅप गुगल प्ले स्टोअरवर दिसत होती. त्यामुळे गुगने हा निर्णय घेतला आहे.
३० जूनच्या रात्री मोदी सरकारने टिकटॉक, हॅलो यांसह एकूण ५९ App वर बंदी घातली. पूर्व लडाखमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर सीमेवर तणाव आहे. तसंच देशातून चीनला उत्तर देण्याचा सूर उमटला. त्या अनुषंगाने हा निर्णय मोदी सरकारने घेतला. काही दिवसांपूर्वीस भारतीय गुप्तचर यंत्रणांनी ५२ धोकादायक चिनी App संदर्भात इशारा दिला होता. भारताने या अॅपवर बंदी घालावी किंवा देशातील नागरिकांनी ही App वापरू नयेत असं आवाहन केलं होतं. दरम्यान भारत सरकारने ३० जूनच्या रात्री ५९ App वर बंदीच घातली.
चीनमधील या App वर बंदी घालण्यात आली तरीही गुगल प्ले स्टोअरवर ही अॅप्स दिसत होती. त्याच अनुषंगाने आता गुगलने ही सगळी चिनी अॅप्स ब्लॉक करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा आहे असंही गुगलने म्हटलं आहे.